महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2018 : आज भारत वि. न्यूझीलंड आमनेसामने

गयाना – आजपासून महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाच्या सामन्यास सुरूवात होणार आहे. भारतीय महिला संघ आज न्यूझीलंड महिला संघाविरूध्दात स्पर्घेतील पहिला सामना खेळणार आहे. विश्वचषकातील पहिला सामना जिंकून भारतीय संघ विजयी सुरूवात करण्यास उत्सुक असेल. भारतीय महिला संघ एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या तुलनेत टी20 क्रिकेटमध्ये प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मागील वर्षी भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. भारतीय संघातील सहा महिला खेळाडू  पहिल्यादांच विश्वचषकात सहभागी होत आहेत. मागील पाच टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ केव्हाच अंतिम फेरीत दाखल होऊ शकला नाही. 2009 आणि 2010 मध्ये फक्त भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल झाला होता.

पहिल्यादांच महिला टी20 विश्वचषक स्पर्धा ही पुरूष टी20 विश्वचषक स्पर्धेपासून वेगळी आयोजित केली जात आहे. यापूर्वी महिला आणि पुरूष दोन्ही स्पर्धा एकावेळेस होत असे. विश्वचषक टी20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड विरूध्द खेळणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.30 वाजता रंगणार आहे.

आजच्या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूची निवड खालील खेळाडूमधील होईल.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तान्या भाटिया (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, दयालान हेमलता, मानसी जोशी, वेदा कृष्णमूर्ति, स्मृति मंदाना, अनुजा पाटील, मिताली राज, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, पूनम यादव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)