भारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान

File photo

महिला टी-20 विश्‍वचषक क्रिकेट मालिका

प्रोव्हिडन्स – भारतीय महिला संघाने टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत धडाक्‍यात प्रवेश केला असला तरी भारतीय संघाचा साखळी फेरीतील एक समना अद्याप पर्यंत शिल्लक असून भारतासारखेच उपान्त्यफेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाचे आज भारतासमोर कडवे आव्हान असणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांनी उपान्त्यफेरीत एक-एक सामना राखून सहज प्रवेश केला असून दोन्ही संघांचे साखळी फेरीत समान गूण असले तरी ऑस्ट्रेलियाचा संघ नेट रण रेटमधील फरका मुळे अ गटातून अव्वल स्थानी आहे तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांनी साखळी सामन्यातील आपापले सामने जिंकले असले तरी आत्मविश्‍वास वाढविण्याच्या दृष्टीने दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळविण्याच्या दृष्टीने खेळताना दिसून येणार आहेत.

भारतीय संघाने विश्‍वचषक स्पर्धेत विजयी धडाका लावला असून पहिल्याच सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता तर त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात मिताली राजने अर्धशतकी खेळी साकारून संघातील आपले स्थान किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले आहे.

मात्र, भारताची दुसरी सलामीवीर स्मृती मंधना, तानिया भाटीया, वेदा कृष्णमुर्तीयांना अद्याप पर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही ही चिंता भारतीय संघ व्यवस्थापनाला या सामन्यात जाणवत असणार आहे. तर, दुसरीकडे भारतीय फिरकी गोलंदाजांनी स्पर्धेत आता पर्यंत चांगल्या कामगिरीची नोंद करताना प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्यात यश मिळवले आहे.

यावेळी भारतीय संघाने आपल्या तिन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे. यात भारताने आपल्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडचा 34 धावांनी पराभव केला तर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. तर आयर्लंडचा 52 धावांनी पराभव करत उपान्त्यफेरीत आपले स्थान पक्‍के केले आहे.

तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेतील आपल्या तिन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना एकतर्फी पराभूत केले आहे. त्यात पाकिस्तानला 52 धावांनी पराभूत केले तर आयर्लंडचा 9 गडी राखून पराभव करतानाच न्युझीलंडचा 34 धावांनी पराभव करत उपान्त्यफेरी गाठली आहे.

दोन्ही संघांनी स्पर्धेत आता पर्यंत विजयी कामगिरी केलेली असली तरी आजच्या सामन्यात भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रलियाचा संघ जास्त मजबूत आहे. कारन दोन्ही संघांमधिल मागिल पाचही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी पराभव केला होता. त्यामुळे भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये सुधारना करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधना, मिताली राज, जिमिमा रॉड्रिक्‍झ, वेदा कृष्णमूर्ती, दिप्ती शर्मा, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्‍त, दयालन हेमलथा, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी.

ऑस्ट्रेलिया महिला संघ – मेग लॅनिंग, रेचल हेंस, निकोल बोल्टन, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हिली, डेलिसा किमिन्स, सोफी मॉलिनेक्‍स, बेथ मूनी, एलिसा पेरी, मेगन शुट, एलिसा व्हिलानी, तायेला वॅलिमेनिक, जॉर्जिया वेअरहॅम, निकोला केअरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)