वेस्ट इंडिजला हरवत ऑस्ट्रेलियाचा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश

नॉथ साउंड : सलामीवीर फलंदाज अलीसा हेली46 आणि कर्णधार मेग लॅनिंगच्या संयमी 31 धावांच्या बळावरमहिला विश्वचषकाच्या पहिल्या उपान्त्यफेरीत ऑस्ट्रेलियाने गत विजेत्या वेस्ट इंडिज संघाला 71 धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत गाठली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज महिला संघासमोर 143 धावांचे लक्ष्य दिले होते. तर वेस्ट इंडिजचा महिला संघ सर्वबाद 71 धावा करू शकल्याने त्यांचा घरच्या प्रेक्षकांसमोर मोठा पराभव झाला.

वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विजयासाठी ऑस्ट्रेलियाने दिलेले 143 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या विंडिजच्या सलामीवीरर घोर निराशा केली. त्यांचे दोन्ही सलामीवीर संघाची धावसंख्यान 15 असताना तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार स्टिफनी टेलरने 28 चेंडूत 16 धावांची खेळी केली. टेलर बाद झाल्यानंतर त्यांच्या बाकी महिला फलंदाज आपली हजेरी लावून बाद झाल्या. टेलर वगळता वेस्ट इंडिजची अन्य कोणतीही महिला फलंदाज दोनअंकी धावसंख्या गाठू शकली नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 17. 3 षटकात 71 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी इलीस पेरी, ए. गार्डनर आणि डी. किमिन्स यांनी प्रत्येकी 2बळी मिळवत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.

-Ads-

तत्पूर्वी, प्राथयम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाची सुरुवात देखील खराब झाली. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बी. मुनी फक्त 8 धावा काढून बाद झाली. त्यानंतर फलंदाजीस आलेली कर्णधार मेग लॅनिंग आणि सलामीवीर अलीसा हेली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात अलीसा हेली 46 धावा करून बाद झाली. त्यानंतर गार्डनर 14 आणि लॅनिंग 31 बाद झाल्यावर रिचेल हेन्सने 15 चेंडूत 25 धावांची आक्रमक खेळे करत ऑस्ट्रेलियाला 142 धावांपर्यंत मजल मारून दिली.

या सामन्यात अलीसा हेलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मागील पाच सामन्यात खेळताना 4 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. या सामन्यानंतर बोलताना तिने सांगितले की, मैदानावर फलंदाजी करणे खूप अवघड होते. त्यात 120 पेक्षा जास्त धावा केल्यावर आम्हाला विजयाचे आशा होती. गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केल्याने आम्हाला विजय मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)