बेट्‌सने टी-20 मध्ये केल्या तीन हजार धावा

गयाना – न्यूझीलंडच्या धडाकेबाज फलंदाज सूजी बेट्‌सने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा ओलांडून विक्रम प्रस्थापित केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारी ती पहिली महिला ठरली आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात 11 धावा करत तिने हा विक्रम केला.

बेट्‌सने 108 सामन्यांमध्ये 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तिने 105 डावांमध्ये 30.68च्या सरासरीने 3,007 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

-Ads-

टी-20 महिला क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत बेट्‌स अग्रस्थानी विराजमान असून, वेस्ट इंडिजची स्टेफिनी टेलर (2,732) दुसऱ्या, इंग्लंडची चार्लेस एडवर्डस (2,605) तिसऱ्या, तर भारताची मिताली राज 2,283 धावांसह चौथ्या स्थानी आहे. तर, दुसरीकडे टी-20 पुरुष क्रिकेटमध्ये न्यूझीलॅंडचा मार्टिन गप्टिल 2,271 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताचा रोहित शर्मा (2,207) दुसऱ्या, तर कर्णधार विराट कोहली (2,102) तिसऱ्या क्रमांकावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)