‘महिला विश्‍वचषका’त पेनल्टी धावांचीच जास्त चर्चा

खेळपट्टीच्या संरक्षीत भागावरून धावल्याने 15 धावांचा दंड

जाॅर्जटाऊन – महिला टी-20 विश्‍वचषकात रविवारी पाकिस्तानचे फलंदाज दोनवेळा खेळपट्टीच्या संरक्षीत भागावरून धावल्याने पाकिस्तानला पेनल्टी बसली आणि भारताच्या खात्यात जादाच्या 10 धावांची भर पडली. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजी पुर्वीच संघाच्या धाव फलकात 10 धावांची भर पडलेली होती. त्यामुळे भारतीय संघाचा विजय आणखीनच सोपा झाला. तर, त्यानंतर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड सामन्यात आयर्लंडचे फलंदाज खेळपट्टीच्या संरक्षीत भागावर गेल्याने त्यांना एक पेनल्टी बसली आणि पाच धावा ऑस्ट्रेलियाच्या खात्यात जमा झाल्या. एकाच दिवशी तीन पेनल्टी बसल्याने खेळपट्टीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

पाच धावांची पेनल्टी देण्याअगोदर अंपायर त्या संघाची चूक निदर्शनात आणून देतात. जर त्यानंतरही खेळाडू खेळपट्टीच्या संरक्षित भागावरून धावत असेल तर विरोधी संघाला पाच धावा दिल्या जातात. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पंचानी पाकिस्तानला पाच धावांची पहिली पेनल्टी देण्याआगोदर तीन वेळा चूक निदर्शनास आणून देत समाज दिली होती. तरीदेखील तीच पुन्हा दोन वेळा चूक झाल्याने भारताच्या खात्यात दहा ज्यादा धावा जमा केल्या गेल्या.

या स्पर्धेच्यापूर्वीच खेळपट्टीवरील संरक्षीत जागेतून फलंदाज आणि गोलंदाजांना धावण्यापासून रोखण्यासाठी पंचानी चर्चा केली होती. त्यात आयसीसीसीच्या नियमानुसार, प्रथम त्यांची चूक पंचानी निदर्शनास आणून द्यावे, त्यानंतर तीच चूक केल्यास त्यांना ताकीद देण्यात यावी. त्यानंतर ही तीच चूक झाली तर नियमानुसार विरोधी संघाला धावा देण्यात याव्यात, अशी चर्चा झाली असल्याचे क्रिकइन्फो या संकेतस्थळावरून हि माहीती देण्यात आली आहे.

तर, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर आयर्लंडच्या खेळाडूंनी 5 अतिरिक्त धावा ऑस्ट्रेलियाच्या खात्यात जमा झाल्याने नाराजी दाखवली. आयर्लंडची खेळाडू किम गर्थ म्हणाली, नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड देणे हे योग्यच आहे. परंतु, आम्हाला फक्त एकवेळा ताकीद दिली गेली आणि पुन्हा चूक झाल्यावे धावा विरोधी संघाला देण्यात आल्या.

तर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला तीन वेळा ताकीद दिली गेली होती आणि नंतर पेनल्टी म्हणून धावा त्यांच्या खात्यात जमा झाला होत्या. या वादाला गांभीर्याने घेत आयर्लंड क्रिकेट बोर्डाने देखील ट्विटकरताना आपला आक्षेप नोंदविला आणि संरक्षीत भाग वेगळा दिसण्यातही तेथे थोडे गवत ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

पहिल्या सामन्यानंतर प्रॉव्हिडन्सच्या मैदानातील खेळपट्टी थोडी संथ झाल्याची टीका सुरु झाली होती. प्रॉव्हिडन्सच्या मैदानावर जास्त सामने होणार असल्याने तेथील खेळपट्टी खेळण्यास योग्य ठेवण्याच्यादृष्टीने खूप वाद ओढवत आहेत. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिसे पेरी म्हणाला, मला माझ्या संपूर्ण कारकिर्दीत खेळपट्टीच्या मुद्यावरून इतकी चर्चा झाल्याचे अठवत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)