ICC Test Rankings : पुजारा टाॅप-3 मध्ये तर पंतने केली ‘या’ विक्रमाशी बरोबरी..

दुबई – भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याला ऑस्‍ट्रेलिया विरूध्द केलेल्या दमदार कामगिरीचे बक्षिस मिळाले आहे. पुजारा या दमदार कामगिरीच्या जोरावार आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये टाॅप तीन फलंदाजामध्ये समाविष्ट झाला आहे. तसेच सिडनी कसोटीत शतक ठोकणारा ऋषभ पंत याने 21 स्थानाने झेप घेतली आहे. त्याने फलंदाजीच्या क्रमवारीत भारतीय यष्टीरक्षकाच्या मागील विक्रमाशी बरोबरी केली आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल स्थानी कायम आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा दुसऱ्या स्थानावार आहे.

पुजारा याने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत एकूण 521 धावा केल्या. सिडनीमध्ये अखेरच्या सामन्यात केलेल्या 193 धावांमुळे तो क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पुजारा यांच्या नावे एकूण 881 गुण आहे. तर कोहलीच्या नावे 922 गुण आहेत.

ऋषभ पंत हा क्रमवारीत 17 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने भारतीय यष्टीरक्षकांच्या मागील सर्वोकृष्ट क्रमावारीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. माजी भारतीय यष्टीरक्षक फारूख इंंजीनियर हे जानेवारी 1973 मध्ये 17 व्या स्थानी पोहचले होते. पंतच्या नावे 673 गुण असून कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाचे हे सर्वाधिक गुण आहेत. पंतच्या नंतर महेंद्र सिंग धोनी (662गुण) याचा नंबर येतो.

पंतने केवळ 9 कसोटी सामन्यानंतर टाॅप 20 मध्ये स्थान मिळविले आहे. ऑस्‍ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी पंत 59 व्या क्रमांकावर होता. या मालिकेत पंतने 350 धावा आणि 20 झेल घेतले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)