आयसीसी कसोटी क्रमवारी : ‘विराट कोहली’ अव्वल स्थानी कायम

पुजारा आणि शमी यांच्या क्रमावारीत सुधारणा

नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार ‘विराट कोहली’ आयसीसी फलंदाजांच्या ‘कसोटी’ क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. सोमवारी आयसीसीकडून जाहिर करण्यात आलेल्या ताज्या क्रमावारीत विराट 937 गुणांसह अव्वलस्थानी आहे.

भारतीय संघ इंग्लंडविरूध्द चौथ्या कसोटी सामन्यात 60 धावांनी पराभूत झालाआहे. पाच सामन्याच्या मालिकेत इंग्लंड 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटीत विराटने पहिल्या डावात 46 आणि दुसऱ्या डावात 58 धावा काढल्यानंतरही विराट अव्वलस्थानी कायम आहे. विराटने चार कसोटी सामन्यात आठ डावांमध्ये एकूण 544  धावा केल्या आहेत.

पुजारा आणि शमी यांना फायदा

कसोटी क्रमवारीत फलदांजीमध्ये भारताचा चेतेश्वर पुजारा हा सहाव्या स्थानावर कायम आहे. साऊथहॅम्पटन कसोटीमध्ये भारतासाठी 132 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या पूजारा याचे गुण 763 वरून 798 झाले आहेत. तर भारताचा वेगवान गोलदांज मोहम्मद शमी याने चौथ्या कसोटीमध्ये एकूण सहा बळी घेतले आहेत. या चांगल्या कामगिरीमुळे त्याला तीन स्थानाचा फायदा झाला असून तो 19 व्या स्थानावर पोहचला आहे.

याशिवाय ईशांत शर्मा एका स्थानावरून वर येत 25 व्या स्थानावर आला आहे.तर जसप्रीत बुमराह हा 37 व्या स्थानांवर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)