आयसीसी क्रमवारीत कुलदीपची दुसऱ्यास्थानी झेप

दुबई – न्यूझीलंड विरुद्धच्या टी – 20 मालिकेत भारताचा 2-1 अशा फरकाने पराभव झाला. मात्र या सामन्यात अनेक खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्याचा फायदा या खेळाडूंना क्रमवारीतील गुणांमध्ये झाला आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने न्यूझीलंड दौऱ्यावर केलेल्या आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी रॅंकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
कुलदीपने न्यूझीलंड विरुद्ध अखेरच्या सामन्यात 26 धावा देऊन दोन बळी टिपले होते. त्यामुळे त्याला आपल्या टी 20 कारकिर्दीतील

सर्वोत्तम क्रमवारी मिळाली आहे. पहिल्यास्थानी अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशीद खान आहे. कुलदीप त्याच्यापेक्षा केवळ 65 गुणांनी मागे आहे. या व्यतिरिक्‍त, अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला क्रमवारीत 39 गुणांची बढती मिळाली असून तो कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा 58व्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे.

रोहित शर्मा आपल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर 10व्या स्थानावरून 3 स्थाने वर सरकून 7व्या स्थानी पोहोचला आहे. तर शिखर धवनदेखील या यादीत एक स्थान वर सरकून 11व्या स्थानी पोहोचला आहे. तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 12व्या स्थानी पोहोचला असून रॉस टेलर 51 व्या स्थानी तर मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा यष्टीरक्षक फलंदाज टीम सेयफर्टने 87 स्थानांची प्रगती करत 83वे स्थान पटकावले आहे. तर, टीम साउदी 30व्या स्थानी आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघाच्या गुणांमध्ये घट झाली आहे. भारताचे 2 गुण कमी झाले असून सध्या भारत 124 गुणांवर आहे. तर, पाकिस्तानचेही 3 गुण कमी झाले आहेत. संघाच्या क्रमवारीत फरक पडलेला नसून पाकिस्तान व भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

टी 20 मधील आघाडीचे 5 गोलंदाज

1) रशीद खान (अफगाणिस्तान)- 793, 2) कुलदीप यादव (भारत)- 728, 3) शादाब खान (पाकिस्तान)- 720, 4) इमाद वसीम (पाकिस्तान)- 705, 5) आदिल रशीद (इंग्लंड)- 676.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)