क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश होणार ?

नवी दिल्ली – चार वर्षानंतर इंग्लंडमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ( काॅमनवेल्थ गेम्स) क्रिकेट रसिकाना आता चौकार षटकार पहायला मिळू शकतात. आगामी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येण्याची शक्यता असून यासाठी आयसीसीने पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती आयसीसीने अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी20 क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी आयसीसीने रितसर अर्ज केला आहे. हा अर्ज इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाअंतर्गत केला आहे. हा अर्ज मान्य झाल्यास 24 वर्षानंतर क्रिकेट हा खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत दिसेल.

क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत एकदाच समावेश करण्यात आला होता. 1998 मध्ये मलेशिया येथे झालेल्या राष्ट्रकुल (काॅमवेल्थ ) स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद पटकाविले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)