आयसीसी क्रमवारी : फलंदाजीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

विराट कोहली अव्वल स्थानावर कायम

नवी दिल्ली – आशिया कप सातव्यांदा आपल्या नावावर केल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. रविवारी आयसीसीव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या एकदिवसीय क्रमवारीत आशिया कप स्पर्धेत भारताचे कर्णधार पद भूषविलेला रोहित शर्मा फलंदाजीमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर शिखर धवन हा सुध्दा टाॅप 5 फलंदाजाच्या क्रमवारीत सामिल झाला आहे. तर विराट कोहली हा अव्वल स्थानावर कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशिया कपमध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी ठरलेले सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन्हींच्या एकदिवसीय क्रमवारीत सुधारणा झाली आहे. रोहितने चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे शिखर धवन याने सुध्दा नवव्या स्थानावरून पाचवे स्थान पटकाविले आहे.

रोहितने अाशिया कपमध्ये 317 धावा केल्या आहेत. तर आशिया कपमध्ये शिखर धवनने एकूण 342 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या दोन शतकांचा समावेश आहे. यामुळे तो आशिया कपमध्ये मालिकावीर ठरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)