आयसीसी क्रमवारी : अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ‘रशीद खान’ अव्वल

नवी दिल्ली – आयसीसीव्दारे रविवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या अष्टपैलू खेळाडूच्या यादीत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भेदक गोलंदाज रशीद खान याने अष्टपैलू खेळाडूंच्या जागतिक क्रमावारीत अव्वलस्थान पटकाविले आहे. रशीद खान याने बांगलादेश संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याला मागे टाकले आहे.

रशीद खान याने आपल्या क्रमवारीत सहा स्थानानी सुधारणा केली आहे. रशिद हा खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू तर जगातील 32 वा खेळाडू ठरला आहे. रशीद खान हा 353 गुणासह अव्वल स्थानी पोहचला आहे. तर याआधी पहिल्या स्थानावर असलेला शाकिब हसन हा 341 गुणासह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर दुसरीकडे आयसीसीच्या गोलंदाजीच्या क्रमवारीत देखील रशीद खान हा दुसऱ्या स्थानवर आहे. तर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराहच्या खात्यात 797 गुण आहेत तर रशीद खान याच्या नावे 788 गुण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)