नवी दिल्ली – विश्व चषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेट फिवर दिसत आहे. विश्व चषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे.
स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरु असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी)ने शुक्रवारी ट्विटर या सोशल मीडियावरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे.
🎶 The Official #CWC19 Song is here! 🎶
'Stand By' from @thisisloryn & @Rudimental is out now!https://t.co/6cgKKOOpBY
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 17, 2019
दरम्यान, यावर्षी विश्व चषक स्पर्धेत जगभरातील १० देश सहभागी होणार आहेत. यंदा चौथ्यांदा विश्व चषक स्पर्धेचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी साल १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ४५ दिवस विश्वचषक रंगणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना हा क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना १४ जुलै रोजी खेळला जाणार आहे.