T20 WorldCup 2020 : श्रीलंका आणि बांगलादेश थेट पात्र नाही

दुबई – आगामी वर्षात म्हणजेच साल 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आयसीसीने केली आहे. पात्रतेच्या निकषानुसार भारत, पाकिस्तान, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान यांनी सुपर 12 संघात थेट प्रवेश मिळवला आहे.

डिसेंबर 2018 च्या आयसीसी टी20 क्रिकेट क्रमवारीनुसार  हे संघ ठरविण्यात आले आहेत. तर टी20 विश्वचषकाचे माजी विजेते आणि तीन वेळेचे उपविजेते श्रीलंका व बांगलादेश यांना मात्र थेट प्रवेश मिळून शकला नाही. त्यामुळे त्यांना साखळी फेरीत अन्य सहा पात्रता फेरीतील संघाबरोबर खेळावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी टी20 विश्वचषक हा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ऑस्ट्रेलियात रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)