#CWC19 : भारतीय संघ विश्वकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार – रिचर्डसन

नवी दिल्ली – भारतीय संघाचा डाव न्यूझीलंडविरूध्दच्या एकदिवसीय सामन्यात 92 धावांवरच आटोपला, त्यानंतर काही वेळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी भारतीय संघ हा 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वकपमध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

गुरूवारी आयसीसी आणि कोकाकोला यांच्यात पाच वर्षासाठी करार करण्यात आला यावेळी रिचर्डसन यांनी विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचे प्रबळ दावेदार कोण असेल याचा अंदाज व्यक्त केला. रिचर्डसन यांना विचारण्यात आले की, तुम्ही भारतीय संघास विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सांगत आहात पण काही वेळापूर्वी भारतीय संघ हॅम्लिटनमध्ये चौथ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या 92 धावांवर आटोपला. तर यावर रिचर्डसन यांनी हसत उत्तर दिले की, ‘प्रत्येकाचा आपला एक दिवस असतो’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयसीसी 2019 विश्वचषकासाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे या स्पर्धेबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. तसेच या विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडणार आहे. 30 मे 2019 पासून या स्पर्धेस सुरूवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)