मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचे भारतात आगमन

नवी दिल्ली: मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत अब्दुल्ला यामिन यांना पराभूत करून इब्राहिम मोहम्म्द सोलिह हे मालदिवचे अध्यक्ष बनले आहेत. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह हे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

दोन नेत्यांमध्ये द्विपपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासंबंधी बोलणी होणार आहेत. त्यानंतर अध्यक्ष सोलिह हे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याही भेटी घेणार आहेत. मालदिवला परतण्यापूर्वी सोलिह जगप्रसिद्ध ताजहालला भेट देणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात सोलिह यांच्या शपथ ग्रहण समारंभासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माले येथे गेले होते.
तेथे त्यांनी मालदिवबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा प्रकट केली होती. भारत आणि माले यांच्यातील मैत्रीच्या नूतनीकरणावर त्यांनी जोर दिला होता.

मालदिवचे पूर्व अध्यक्ष अब्दुल यामिन यांनी फेब्रुवारी महिन्यात आणीबाणी लागू केल्या नंतर दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला होता,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)