IBPS PO 2018 : प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या ४ हजार पेक्षा अधिक पदासाठी भरती

नवी दिल्ली – बँकिंग कर्मचारी निवड संस्था (आयबीपीएस) ने प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या एकूण ४,१२० जागा भरण्यासाठी पात्र उमेव्दारांकडून आॅनलाईन पध्दतीन अर्ज मागविण्यात येत आहेत.

आॅनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर आहे.  पदाच्या नियुक्तीसाठी उमेदवाराला पूर्व आणि प्रमुख परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय हे कमीत कमी २0 आणि जास्तीत जास्त ३0 असावे.

प्रोबेशनरी आॅफिसर पदाची पूर्व परीक्षा विविध ठिकाणच्या केंद्रावर १३,१४,२० आणि २१ अाॅक्टोबर ला आॅनलाइन पध्दतीने होईल. पूर्व परीक्षेकरीता अोळखपत्र १८ सप्टेंबरला उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारानी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळाला ( ibps.in ) भेट देऊन व्यवस्थित माहिती वाचून मगच अर्ज करावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
110 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)