जम्मू-काश्‍मीरमधील आयएएस टॉपर शाह फैसलचा राजीनामा-राजकारण प्रवेशाचे संकेत

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): जम्मू-काश्‍मीरमधील आयएएस अधिकारी शाह फैसल याने राजीनामा दिला आहे. सन 2010 च्या बॅचचा शाह फैसल टॉपर आहे. काश्‍मिरींच्या होणाऱ्या हत्या आणि केंद्रसरकारकडून प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव ही त्याने आपल्या राजीनाम्याची कारणे दिली आहेत.

परदेशातून नुकतेच प्रशिक्षण घेऊन आलेल्या शाह फैसलची पोस्टिंग व्हायची होती. मात्र त्याने आज राजीनामा सादर केला. वाढता हिंदुत्व प्रभाव आणि देशातील सुमारे 20 कोटी मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या नागरिकांची वाग़णूक दिली जात असल्याचेही त्याचे म्हणणे आहे; या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे त्याने म्हटले आहे. प्रत्यक्ष नाव न घेता शाह फैसल याने केंद्रातील मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे.
आपल्या भावी योजना शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे त्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाह फैसल याच्या राजीनाम्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी त्याचे राजकारणात स्वागत केले आहे. नोकरशाहीचे नुकसान हा राजकारणाचा फायदा आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले.

शाह फैसलच्या विरोधात केंद्रसरकारने शिस्तभंगाची कारवाई सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी शाह फैसलचा राजीनामा आला आहे. नियमानुसार त्याचा राजीनामा राज्याचे मुख्य सचिव विजिलन्स रिपोर्टसह पुढे पाठवतील. डीपीटी (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) त्याच्या राजीनाम्यावर निर्णय घेईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)