भुवनेश्वर- ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेणं एका अधिकाऱ्याला भलतंच महागात पडलं आहे. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यता प्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारची चौकशी करणं हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. एप्रिल २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निर्देशानुसार, एसपीजी सुरक्षा प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना अशा झाडाझडतीतून सूट प्राप्त होते. या तपासणीमुळे पंतप्रधानांना या ठिकाणी 15 मिनिटे थांबावे लागले.
A mysterious box was unloaded from PM Modi’s helicopter at Chitradurga yesterday and loaded into a private Innova which quickly sped away. The #ElectionCommission should enquire into what was in the box and to whom the vehicle belonged. @ceo_karnataka pic.twitter.com/iudqT143Bv
— KPCC President (@KPCCPresident) April 13, 2019