अंबालात आय ए एफ जग्वार विमानाचा अपघात

अंबाला – भारतीय हवाई दलाच आय ए एफ जग्वार ( IAF Jaguar ) विमानाचा आज सकाळी अंबाला एअरबेस स्टेशनवर मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला हवाई क्षेत्राच्या परिसरात ही घटना घडली असून विमानाच्या इंधन टाकीला पक्षी धडकल्याने त्याला आग लागली आणि इंधनाच्या टाकीचा काही भाग जमिनीवर कोसळला. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत विमानाचं तातडीनं लॅंडिंग केले. दरम्यान, इंधनाच्या टाकीचा काही भाग बलदेवनगर परिसरात जमिनीवर कोसळल्यामुळे या परिसरातील स्थानिकांना खूप मोठा आवाज ऐकायला आला. कोसळलेल्या भागातील घरांना तडे गेले आहे. काही दिवसांपूर्वी 8 जून रोजी गोव्यातील दाबोळी विमानतळावर मिग 29 के या विमानाच्या इंधनाची टाकी कोसळून या टाकीने पेट घेतल्यामुळे विमान सेवेवर परिणाम झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)