मी पाकिस्तानला जाणार नाही- आमीर खान

मुंबई: पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इम्रान खान या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असे स्वतः इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ हा इम्रान खान यांचा पक्ष शपथविधीसाठी जोरदार तयारी करत असून या शपथविधी सोहळ्यासाठी मिस्टर परफेक्ट आमिर खानला सुद्धा निमंत्रण दिल्याचे वृत्त होते. मात्र आमीर खान यांनी हे वृत्त फेटाळले असून मला कोणतेही निमंत्रण आले नाही. तसेच कामात व्यस्त असल्यामुळे पाकिस्तानला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-

आमीर खान म्हणाला, पानी फाउंडेशनच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी पाकिस्तानला जाणार नाही. १२ ऑगस्टला पानी फाउंडेशनचा १०,००० ग्रामवासीयांच्या खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याच कामात व्यस्त असल्याचे आमिर म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)