मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही- सपना चौधरी

नवी दिल्ली: सपना चौधरी मथुरा मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याची जोरदार चर्चा काल रंगली होती. मात्र आज सपना चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसेच “मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. तसेच राज बब्बर यांच्याशी मुलाखत झाले नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले”

सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि लोकसभा निवडणुका लढणार या फक्त चर्चा आहेत. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती काँग्रेसकडून अथवा सपना चौधरीकडून देण्यात आलेली नाही. तसेच सपना उत्तर प्रदेशच्या मथुरेच्या जागेवरून लोकसभा लढणार असल्याचीही माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. जर सपना चौधरीला तिकीट मिळाले तर तिच्यात आणि प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यातील लढत पहायला मिळेल, आणि ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)