‘त्या’ नक्षल्यांचे नेतृत्व मी करेन : खा. उदयनराजे भोसले

वडूज – संपूर्ण खटाव तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीकरीता तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते तहसिलदार कार्यालयासमोर खरडा भाकरी खाऊन मंगळवारी ता. 6 रोजी काळी दिवाळी साजरी करणार आहेत. या आंदोलनाचे निवेदन श्री.छ.खा. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी खासदार उदयनराजे व प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकापासून बैलगाडीत बसून मोर्चाने तहसिलदार कार्यालयावर गेले.

यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन व शासन कर्त्यांनी तालुक्‍यातील जनतेच्या भावना जाणून योग्य वेळी दुष्काळ जाहीर न केल्यास लोक नक्षलवादी बनतील व त्यांच्या या कृतीस आपला पाठींबाच राहील असा परखड इशारा त्यांनी दिला.
यावेळी हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, डॉ. सुरेश जाधव, अशोकराव गोडसे, संदिप मांडवे, मानाजी घाडगे, रासपचे श्रीकांत देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा. उदयनराजे म्हणाले, प्रशासनाच्या वेगवेगळ्या निकषांमुळे समाजात दरी निर्माण होत आहे. एखाद्या भागाला झुकते माप तर दुसऱ्या भागावर अन्याय केला जात आहे. यामुळे खटाव सारख्या कायम स्वरूपी दुष्काळी तालुक्‍यात संतापाची लाट निर्माण होणे साहजिक आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवा वर्गाने वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून न्याय मागण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. त्यास लोक प्रतिनिधी या नात्याने आपला जाहीर पाठींबा राहील. यावेळी त्यांनी भाषणात दुष्काळी भागातील शेती पाणी योजनांसाठी आत्तापर्यंत कोट्यावधी रूपयांचा खर्च झाला आहे. मात्र प्रत्यक्षात निधीच्या प्रमाणात कामे झाली नाहीत त्याचा परिणाम आज जनतेला भोगावा लागत आहे.

या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच दुष्काळ संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. यावेळी धैर्यशिल कदम, विजय शिंदे, नाना पुजारी, अनिल पवार, यांची मनोगते झाली. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन तर नगराध्यक्ष विपूल गोडसे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक संदिप गोडसे, अभय देशमुख, डॉ. प्रशांत गोडसे, बाबा फडतरे आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार जयश्री आव्हाड यांनी निवेदन स्विकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)