मला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद पाहिजे- रामदास आठवले

मुंबई: दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून वाद संपण्याची शक्यता आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत रामदास आठवले यांना राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे आठवलेंनी माघार घेतली.

आठवले म्हणाले, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून याआधी मी निवडून आलो होतो.  २०१४ च्या निवडणुकीनंतर माझे आणि मित्र पक्षाचे याबाबत बोलणे देखील झाले होते. त्यामुळे ही जागा मी लढविण्याचे अपेक्षित होते, परंतु माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले आहे.  दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यांना आशिर्वद आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असेही आठवले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)