नवी दिल्ली – मला कामाची नशा आहे. त्यामुळे मी केवळ साडेतीन तासच झोप घेतो, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. अभिनेता अक्षय कुमारने नरेंद्र मोदींची आज खास मुलाखत घेतली. यावेळी मोदींनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
तुम्ही फक्त ३ ते ४ तासच का झोपता? असा प्रश्न अक्षयने मोदींना विचारला. यावर मोदी म्हणाले, मला अनेक जण हाच प्रश्न विचारतात. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा मला झोपेविषयी प्रश्न विचारला होता. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांशी एकेरी भाषेतच आम्ही बोलतो. इतके कमी तास झोपून तू स्वत:चे नुकसान करतोयस असे ते म्हणायचे. पण माझ्या शरीराला तशी सवयच लागली आहे. ३ ते ४ तासांत माझी झोप पूर्ण होते. आणि ही सवय मला खूप आधीपासून आहे, असे त्यांनी सांगितले.
#WATCH PM Narendra Modi in an interaction with Akshay Kumar speaks on his friendship with former US President Barack Obama pic.twitter.com/rGxgPJAAlC
— ANI (@ANI) April 24, 2019