आश्‍वासन मी कधी देत नाही …

राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा
मुरैना -जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यावर कॉंग्रेसचा भर असतो. मी 2004 पासून राजकारणात आहे. जनता माझी भाषणे तपासू शकते. जनतेच्या बॅंक खात्यांमध्ये 15 लाख रूपये जमा करण्यासारखे आश्‍वासन मी दिल्याचे एकतरी उदाहरण दाखवा, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्यप्रदेशच्या मुरैनामध्ये राहुल आदिवासी एकता परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. श्रीमंतांना लाभ होणार असेल तरच भाजपकडून निर्णयांची अंमलबजावणी केली जाते. श्रीमंतांना मदत करायची असेल तर जरूर करा. मात्र, गरीब आणि शेतकऱ्यांनाही आधार द्या. श्रीमंतांची 3 लाख कोटी रूपयांची कर्जे माफ होऊ शकतात.

-Ads-

मग, तशी सवलत गरिबांना आणि शेतकऱ्यांना का दिली जाऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला. राफेल करार, नोटाबंदी, विजय मल्ल्या-नीरव मोदीचे देशाबाहेर पलायन आदी मुद्‌द्‌यांवरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, नर्मदा नदीवर पूजा करून राहुल यांनी जबलपूर जिल्ह्यात रोड शो केला. यावेळी कॉंग्रेसच्या पोस्टर्सवर राहुल यांचा उल्लेख नर्मदा भक्त म्हणून करण्यात आला होता. याआधीच्या मध्यप्रदेश दौऱ्यांवेळी कॉंग्रेसच्या पोस्टर्सवर त्यांचा उल्लेख शिवभक्त आणि राम भक्त म्हणून करण्यात आला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)