स्वाभीमानीच्या शाळेचा मी हेडमास्तर : सदाभाऊ खोत

आंदोलन हा निव्वळ फार्स

मुंबई – पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या दरासाठी पुकारलेले आंदोलन म्हणजे कारखानदारांबरोबर मिळून ठरवलेला एक फार्स होता, अशी टीका करतानाच ते ज्या शाळेत आहेत, त्या शाळेचा हेडमास्तर आपण होतो. त्यामुळे सर्टिफिकीटे कशी निघतात, ते आपल्याला चांगले ठाऊक आहे, असा टोला पणन राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला.

मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचे नाव घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. काही दिवसांपूर्वीच खासदार राजू शेट्टी यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी आणि 200 रूपयांचा भाव मिळावा यासाठी आंदोलन केले. साखर कारखान्यांना कायद्यानुसार एफआरपी देणे बंधनकारक आहे.

-Ads-

कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. केंद्र सरकारने रिकव्हरीच्या 10 टक्‍क्‍यांच्या बेसला 2750 रूपये भाव देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपोआपच 200 रूपये जास्त मिळणार आहेत. उत्पादकांना भाव मिळावा म्हणून साखरेचा दर 29 रूपयांवरून 32 रूपये करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने ऊस उत्पादकांच्या परिषदेतच केली आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणार असून स्वाभिमानीने केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारे होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्वाभिमानीने हे आंदोलन केल्याची टीकाही खोत यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)