मी टू’ सुनामी सारखी अचानक आली आहे : अरबाज खान

मुंबई – गेल्या काही दिवसापासून मी-टू’ च्या वादळाने देशात थैमान घातले आहे. सोशल मीडियामुळे या वादळाची तीव्रता घराघरात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्यासंबंधी घडलेल्या एका गैरप्रकाराला वाचा फोडली आणि पाहता पाहता तिच्या या ‘ठिणगी’चे रूपांतर वणव्यात झाले. या मोहिमेस प्रत्येक दिवशी बॉलिवूड अभिनेते ते राजकीय नेते आपले मत व्यक्त करतात. याच मी टू मोहिमेस बाबत बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मी टू’ मोहीम सुनामी सारखी अचानक आली आहे, बदल अचानक होत असतात, मात्र यात निरपराधी व्यक्ती वाहून जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.”

दरम्यान अरबाजने सांगितले कि, ”महिलांच्या आदर करायलाच हवा, पीडितांना योग्य न्याय मिळायला हवा. तसेच आरोप झालेल्या लोकांसोबत काम करण्यास अनेकांनी नकार दर्शवला आहे. एखाद्याने कितीही गंभीर अपराध केला असला तरी त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद कायद्यात केलेली आहे आणि ती शिक्षा भोगून झाल्यावर त्या व्यक्तीला एक नवे जीवन सुरू करण्याची संधी मिळते.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)