माझ्याकडे एकच मतदान ओळख पत्र – गौतम गंभीर

नवी दिल्ली – दुहेरी मतदान ओळखपत्रांच्या मुद्दयावरून भाजपचा उमेदवार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत आपल्याकडे राजेंद्र नगर, दिल्ली येथील एकच मतदान ओळखपत्र असल्याचे म्हंटले आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिषी यांनी गौतम गंभीरकडे राजेंद्र नगर आणि करोलबाग या दोन्ही ठिकाणची मतदान ओळखपत्रे असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, आतिषी यांनी गौतम गंभीर विरोधात केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या तक्रारीच्या आधारे दिल्लीतील न्यायालयाने 1 मे रोजी सुनावणी करण्याचे निश्‍चित केले आहे. एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असल्याने गंभीरने लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आतिषी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)