निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा- राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ‘राज ठाकरे’ यांनी आज (८ जुलै) ईव्हीएम घोटाळा प्रकरणी निवडणूक आयोगाची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. या पुढच्या महाराष्ट्रातील व इतर सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घ्या, अशी मागणी राज ठाकरेंनी यावेळी आयोगाकडे केली आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी देखील संवाद साधला आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात आलं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही रस नाही. मात्र, आम्ही एक फॉरमॅलिटी म्हणून आयोगाकडे एक पत्र देखील दिले आहे. तसेच, मी त्यांना ईव्हीएम चिप कुठून येते असं विचारलं असता, अमेरिकेतून येत असल्याचं उत्तर मिळालं. त्यामुळे ईव्हीएम हॅक करण्यामागे परकीय शक्तीचा देखील हात असू शकतो. असं देखील राज ठाकरेंनी म्हंटल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)