नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी हे आता त्यांच्या जातीचा उल्लेख करून मते मागत असले तरी मला त्यांची जात माहिती नाहीं आणि कॉंग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षीयांनी देखील त्यांच्या जातीचा उल्लेख कधी केलेला नाही असे प्रतिपादन प्रियांका गांधी यांनी केला आहे. आज अमेठीत पत्रकारांनी त्यांना या विषयी प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी मला त्यांची जात माहिती नाही आणि आम्ही त्यांच्यावर कधीही जातीने टिका केलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मायावती यांनीही मोदींनी जातीचा वापर करीत प्रचार सुरू केल्याबद्दल टीका केली होती. मोदींनी केवळ राजकीय लाभासाठीच स्वताचा मागास जातीत समावेश करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता.