मी लग्नानंतर अमृता सिंहला भेटले नाही – करीना कपूर

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहची लग्नानंतर कधीच भेट झाली नाही. मात्र, लग्नापुर्वी त्यांची आणि माझी बऱ्याच वेळा भेट झाली होती असे करिना कपूरने नुकतेच एका चॅट शो दरम्यान सांगितले. करण जोहरच्या “कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तिने आपल्या सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफ विषयी दिलखुलास गप्पा मारल्या. ज्यात सारा अली खानच्या डेटिंग आणि अमृता सिंह विषयी देखील मोकळेपणाने गप्पा मारल्या.

मी अमृता सिंहचा खूप आदर करते. “कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमृता सिंह साराला घेऊन मला भेटवण्यासाठी यायची. मात्र लग्नानंतर तिची आणि माझी भेट झाली नाही, असे करीना म्हणाली. करणने सारा अली खानच्या डेटिंग विषयी विचारले असता “सध्यातरी सारा आपल्या कामावर प्रेम करते’ असे करीनाने सांगितले. मात्र, करणने कार्तिक आर्यन विषयी छेडले असता करीना म्हणाली की, मला वाटते की, दोघांची केमिस्ट्री चांगली जुळेल. ते लवकरच एकत्र काम करण्याचीही शक्‍यता आहे. मात्र तिच्या या उत्तरात “डेटिंग’चा उल्लेख तिने खुबीने टाळला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)