आय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग २ )

आय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग १ )

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर
चित्रपट हे नेहमीच ठराविक प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात. विशेषतः तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून सिनेमांची निर्मिती केली जाते असं म्हणणं तितकसं वावगं ठरणार नाही. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले बालचित्रपट तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यातही मुलांचे भावविश्‍व जपणारे सिनेमे तर फारच कमी. या सगळ्यामागं बॉक्‍स ऑफिसवर कमाई हा विषय तर आहे; पण त्याहूनही असे चित्रपट बनवण्यासाठी लागणारी प्रगल्भ मानसिकतेची वानवा.

ही कथा राजस्थानमध्ये घडते. त्यामुळं तिथल्या एकंदर भौगोलिक परिस्थितीचा नितांत सुंदर वापर या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. राजस्थान म्हटलं की वाळवंट, म्हणजे रुक्षता. छोटूचं आयुष्यही गरिबीमुळं रुक्ष बनलेलं. त्याचा फार सुंदर मेळ दिगदर्शकानं घातलेला दिसून येतो. छोटूसोबत काम करणारा लपटन, ज्याला सिनेमाची आवड आहे. तो सिनेमातल्या हिरोसारखे केस ठेवतो, त्यांचे संवाद आरश्‍यात पाहून म्हणतो. छोटू जो वयानं लहान आहे; पण डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं भाषण ऐकतो आणि त्यांच्यासारखं बनण्याचं ठरवतो.

स्वतःच्या आयुष्याला दिशाहीन न करता योग्य दिशा देतो. त्याउलट वयानं मोठा असूनही पटकन मात्र दिशाहीन होतो. त्याला काय करायचंय हे त्याला ठाऊक नाही. ज्यामुळं तो छोटूला विरोध करतो. ते म्हणतात ना, आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून लहान करणारे लोक म्हणजे लपटन. ही प्रवृत्ती जनरली सगळीकडंच पाहायला मिळते. त्यामुळं लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून बनवलेला सिनेमा असतानाही तो सर्वानाच अपील होतो, आपलासा वाटतो.
सिनेमा राजस्थानमध्ये घडत असल्यामुळं तिथल्या लोकसंगीताचा सुरेख वापर सिनेमामध्ये पाहावयास मिळतो. या सिनेमाबाबत तर दिगदर्शकाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. प्रत्येक गोष्टीचा सुरेख वापर इथं पाहावयास मिळतो. प्रत्येक फ्रेमवर्क उत्तम जमलेलं आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)