पुण्याचा खासदार मीच; मोहन जोशींचा विश्वास 

पुणे –  लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. भाजप-शिवसेना यंदाही बाजी मारणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशामध्येच पुण्याचे काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांनी मी विजयी होऊन खासदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

मोहन जोशी म्हणाले कि, काँग्रेस आणि इतर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आहे. आणि ज्यावेळी कार्यकर्ते निवडणूक हातामध्ये घेतात त्याचे रूपांतर विजयामध्ये होते. ही पुणे शहराची आजपर्यंतची परंपरा आहे. मी पुण्याचा खासदार होणार याची मला खात्री आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी ४० वर्षांपासून पुण्यातील जनतेची सेवा करत आहेत. यामुळेच पुण्याच्या जनतेने बहुमताने मला मतदान केले आहे. भाजपकडे धनशक्तीची ताकद आहे तर माझ्याकडे जनतेची ताकद आहे. धनशक्ती आणि जनशक्तीच्या लढतीत नेहमीच जनशक्ती विजयी झाली आहे. हा विश्वास मला आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)