मी अद्यापही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात- अर्जुन खोतकर

उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार

मुंबई: जालना लोकसभा मतदारसंघातील युतीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचे चित्र आहे. आजपर्यंतचे सर्व सर्व्हे हे माझ्या बाजुने आहेत. मी लढण्यास इच्छूक असून उद्धव ठाकरे माझ्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, अशी आशा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्ती केली.

-Ads-

अर्जुन खोतकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांमधील राजकीय वैर भाजप-शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. मात्र मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे खोतकर यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खोतकर यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी दिली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन केले होते. दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी अद्याप प्रश्न सुटला नसल्याचे दिसत आहे.

कॉंग्रेस नेत्यासोबत गुप्त बैठक

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आज औरंगाबादमध्ये कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. या बैठकीत खोतकरांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 दिवसांचा कालावधी मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही गुप्त एका प्रसिद्ध बिल्डराच्या घरी संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी खोतकर यांना 24 तासांचे अल्टिमेटम दिल्याचे कळत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)