मी कर्ज फेडालया तयार पण बॅंका पैसे घेत नाही : विजय मल्ल्याच्या उलट्याबोंबा

लंडन : देशातील बॅंकांना कोट्यवधींचा गंडा घालून परदेशात गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने आता आपल्या बॅंकांच्या कर्जावरून उलट्याबोंबा सुरू केल्या आहेत. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल याने विजय मल्ल्याची भेट घेतली. विजय मल्ल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. याफोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्याला चांगलेच ट्रोल केले.

विजय मल्ल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला रिट्विट करत खास मेसेज लिहला आहे. यामध्ये तो म्हणतोय की, गेल्या वर्षाभरापासून मी बॅंकला पैसे द्यायला तयार आहे. गेल्या वर्षभरापासून मी बॅंकला सर्व पैसे द्यायला तयार आहे. बॅंक पैसे का घेत नाही हे त्यांनाच विचारा आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण आहे.

इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषकाचा थरार सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेत आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर युनिव्हर्स बॉसने विजय मल्ल्याची भेट घेतली. या भेटीनंतर गेलने ट्विटरवर दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने काही ओळीही लिहल्या आहेत. तो म्हणतो की, बिग बॉसला भेटल्याचा आनंद आहे. गेलने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)