मी जसलीनसाठी मुलगा शोधत आहे, जो तिच्यावर प्रेम करेल : अनुप जलोटा

सलमान खानाचा विवादित शो “बिग बॉस’मध्ये यंदाच्या वर्षी सर्वात विवादित ठरलेली जोडी म्हणजे जसलीन माथारू आणि अनुप जलोटा यांची. जसलीनने  बिग बॉस शो दरम्यान भावगीत गायक अनुप जलोटा यांच्याबरोबरच्या कथित अफेअरबाबत खुलासा केला होता. “अनुप जलोटा यांच्याबरोबर माझे अफेअर असल्याचे चित्र उभे केले गेले, ही बाब खरी आहे. पण तो केवळ एक मजाक, विनोद होता. आता अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड म्हणून ओळखायला लागले आहेत, ते पाहून मलाच वाईट वाटायला लागले आहे.’ असे जसलीन म्हणाली होती.

दरम्यान, यांच्या कथित अफेअरबाबत खुलासानंतर पुन्हा एकदा अनुप जलोटा यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे कि ”मी स्वत: जसलीनसाठी एक मुलगा शोधत आहे, जो तिच्यावर प्रेम करेल, तिच्यासोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करेल, असे त्यांनी सांगितले. जसलीनबद्दल माझ्या मनात आदर आहे आणि असेल.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)