अमेरिकेत “आय ऍम हिंदू’ अभियान सुरू- हिंदू अमेरिकन फाऊंडेशन

ह्यूस्टन (अमेरिका): अमेरिकेत “आय ऍम हिंदू’ अभियान सुरू करण्यात आले आहे. हिंदू धर्माबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या राष्ट्रव्यापी “आय ऍम हिंदू’ अभियानाचा उद्देश असल्याचे एचएएफ (हिंदू अमेरिकन फाऊंडेशन) ने म्हटले आहे. हिंदूंना धमकावण्याचे अमेरिकेत चाललेले वाढते प्रकार रोखण्यासाठी “आय ऍम हिंदू’ अभियान सुरू करण्यात आल्याचे एचएएफ ने म्हटले आहे. हिंदू धर्माबाबत लोकांचे असलेले गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून दूर करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.

अमेरिकेत हिंदू हा सर्वात यशस्वी अल्पसंख्याक समुदायांपैकी एक समुदाय आहे. तरीही हिंदू लोक आणि हिंदू धर्माबाबत अमेरिकनांना फार थोडी माहिती आहे. अमेरिकेतील दर तीनपैकी एका हिंदूला त्याच्या धार्मिक श्रद्धांमुळे त्रास दिला जातो, अशी आमची आकडेवारी सांगते. यामागे हिंदू धर्माबाबत असलेले गैरसमज हेच कारण आहे, असे एचएएफनी म्हटले आहे.
एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) च्या माहितीनुसार अमेरिकेत 2016 पेक्षा 2017 साली द्वेषयुक्त अपराधांमध्ये (हेट क्राईम) 17 टक्के वाढ झालेली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)