हैदराबाद बाॅम्बस्फोट : इंडियन मुजाहिदीनचे 2 दहशतवादी दोषी, दोघे निर्दोष

नवी दिल्ली – हैदराबाद शहरातील गोकुल चाट आणि लुंबिनी पार्क येथे 2007 साली झालेल्या दुहेरी बाॅम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या खटल्यात इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी दोषी आढळले तर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

न्यायालय पाचव्या आरोपीच्या शिक्षेचा निर्णय सोमवारी सुनावणार आहे. तर दोषी आरोपींना येत्या सोमवारी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. हैदराबादमधील दुहेरी बाॅम्बस्फोटात एकूण 44 लोक मरण पावले होते आणि 68 लोक जखमी झाले होते.

अतिरिक्त महानगर सत्र न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी निकाल सुनावला. न्यायालयाने अनिफ शफिक सईद आणि इस्माईल चौधरी या दोघांना दोषी ठरवले. तर फारूक शार्फुद्दीन तरकश आणि मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी तारिक अंजुम याच्या शिक्षेवरील निर्णयाची सुनावणी न्यायालय 10 सप्टेंबरला करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)