हुसेन शेख हॉकी स्पर्धा : हॉकी पुणे संघाचा दणदणीत विजय

अजितसिंगचा गोलांचा षटकार

पुणे – अजितसिंग याने गोलांचा षटकार ठोकला, त्यामुळेच त्याच्या हॉकी पुणे संघास हुसेन शेख अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत हॉकी किड्‌स संघावर 19-0 असा एकतर्फी विजय मिळविता आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अन्य लढतीत क्रीडा प्रबोधिनीने पिंपरी चिंचवड महापालिका इलेव्हन संघाचा 14-0 असा धुव्वा उडविला. हॉकी लव्हर्सने राजा बांगला स्पोर्टस क्‍लबचा 3-0 असा विजय मिळवित आगेकूच केली.

हॉकी पुणेच्या दणदणीत विजयाचा शिल्पकार अजित सिंग ठरला. त्याने हॅट ट्रिकसह सहा गोल केले. त्याला कर्णधार अब्दुल सलमानी आणि अरविंद कुमार यांनी प्रत्येकी तीन गोल करून सुरेख साथ केली. अजितने 19, 21 आणि 23 व्या मिनिटाला सलग गोल केले. पुन्हा त्याने 26, 32 आणि 51व्या मिनिटाला गोल केले. हॉकी पुणे संघाकडून तालिब शाह, कांचन राजभर यांनी प्रत्येकी दोन, अवनीश सेन, गुणेंद्र आणि सेबॅस्टियन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

क्रीडा प्रबोधिनी संघाने पूर्वार्धात 5 आणि उत्तरार्धात 9 गोलांचा पाऊस पाडून धडाकेबाज विजय मिळविला. हरिष शिंगडी आणि रोहन पाटील यांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यांना के.वेंकटेश आणि धैर्यशील जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल करून योग्य साथ केली. संतोष भरडे, अनिकेत गुरवल, गणेस पाटील आणि राहुल शिंदे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या राजा बांगला संघाला हॉकी लव्हर्स संघाने 3-0 असे सहज हरवले. प्रणय गरसुंड, आकाश बेलिटकर, हर्ष मुथय्या यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांच्या विजयास हातभार लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)