गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीचे आव्हान संपुष्टात

हुसेन करंडक हॉकी स्पर्धा

पुणे – गतविजेत्या एक्‍सलन्सी हॉकी संघाचे हुसेन करंडक हॉकी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मुंबई रिपब्लिक संघाने एकमात्र गोलच्या जोरावर त्यांचा पराभव केला व उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी मैदानावर ही स्पर्धा सुरु आहे. अन्य सामन्यांमध्ये हॉकी पुणे इलेव्हन, रोव्हर्स अकादमी “अ’ आणि क्रीडा प्रबोधिनी संघांचे आव्हान देखील संपुष्टात आले. मुंबई कस्टम, इन्कमटॅक्‍स इलेव्हन आणि स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात संघांनी उपांत्य फेरी गाठली.

मुंबई रिपब्लिकन्स संघाला प्रतिस्पधी एक्‍सलन्सी संघाचे कडवे आव्हान सहन करावे लागले. सामन्यातील एकमेव गोल सामन्याच्या 24 व्या मिनिटाला तेजस चव्हाण याने केला. यानंतर मुंबई रिपब्लिकन संघाने आपले गोलाधिक्‍य वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना एक्‍सलन्सी अकादमीचा बचाव भेदण्यात अपयश आले. त्यांनी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या खऱ्या पण, त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. अनुज सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करण्याची संधी दवडल्यामुळे त्यांना दुसरा गोल करता आला नाही. मुंबई संघाच्या आक्रमकांपेक्षा त्यांचा गोलरक्षक कुणाल ढोले याची कामगिरी लक्षात राहिली. मुंबईच्या विजयात त्याचीच कामगिरी विलक्षण ठरली. त्याने एक्‍सलन्सी संघाचा एक पेनल्टी स्ट्रोक शिताफीने अडविला.

चुरशीच्या सामन्यात मुंबई कस्टम्स संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाचे आव्हान 3-2 असे परतविले. त्यावेळी त्यांच्याकडून इफ्तेदार शेख याने दोन, तर जोशुहा वेसावकर याने एक गोल केला. क्रीडा प्रबोधिनीकडून अनिकेत गुरव आणि रोहन पाटील यांनी गोल केले.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इन्कमटॅक्‍स संघाने नितीन कुमारच्या चमकदार खेळाच्या जोरावर हॉकी पुणे संघाचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले. स्पर्धेत सातत्याने गोल करणाऱ्या हॉकी पुणे संघाच्या आक्रमकांचे चालले नाही. इन्कमटॅक्‍ससाठी नितीन कुमारने खाते उघडले. या वेळी त्याने मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तालिब शेख आणि ऋषभ शहा यांनी गोल करून हॉकी पुणे संघाला आघाडीवर नेले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अजितेश रॉय याने इन्कॅमटॅक्‍सला बरोबरी साधून दिली. शेवटी नितीन कुमारने वैयक्तिक दुसरा गोल करून इन्कमटॅक्‍स संघाचा विजय निश्‍चित केला.

यजमान रोव्हर्स अकादमी “अ’ संघाला स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात संघाकडून पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या चौथ्याच मिनिाला अशाब कुरेशी याने गुजरात संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर अंकित गौडच्या दोन गोलमुळे त्यांना 1-2 अशा पिछाडीवर रहावे लागले. मध्यंतराला सामना 1-1 असा बरोबरीत होता. उत्तरार्धात सुरवातीलाच अंकितने गोल केला. मात्र, त्यानंतर गुजरात संघाने वेगवान खेळ करून सामन्यावर नियंत्रण ठेवले. रुचित पटेलने हॅटट्रिक साधत संघाचा विजय साकार केला. यातील दोन गोल त्याने पेनल्टी स्ट्रोकवर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)