एसएनबीपी संघास हॉकीचे विजेतेपद

पुणे – एसएनबीपी पिंपरी संघाने हुसेन नबी शेख करंडक हॉकी स्पर्धेतील 14 वर्षाखालील गटात विजेतेपदावर मोहोर नोंदविली. त्यांनी अंतिम लढतीत दिल्ली पब्लिक स्कूल “अ’ संघाचा 4-0 असा पराभव केला. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात एसएनबीपी पिंपरी संघाकडून ध्रुव शर्मा याने दोन गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. त्याने 5 व्या व 15 व्या मिनिटाला गोल केले. प्रणय गावडे याने 22 व्या मिनिटाला तर शिवेंद्र जाधव याने 28 व्या मिनिटाला गोल करीत त्याला चांगली साथ दिली. दिल्ली पब्लिक स्कूल “अ’ संघाच्या खेळाडूंनी काही चांगल्या चाली केल्या मात्र, त्यांच्या चालींमध्ये अचूकतेचा अभाव होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली पब्लिक स्कूल “ब’ संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. त्यांनी चुरशीने झालेल्या लढतीत सेंट पॅट्रिक संघाचा 1-0 असा पराभव केला. त्यावेळी त्यांचा हा एकमेव गोल धर्मेश गुप्ता याने 7 व्या मिनिटाला केला. हा गोल झाल्यानंतर सेंट पॅट्रिक संघाच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी भरपूर प्रयत्न केले तथापि दिल्ली पब्लिक स्कूल “ब’ संघाने भक्कम बचाव करीत सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)