दीपिका-रणवीर पडद्यावरही साकारणार पती पत्नीचा रोल?

‘राम-लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकलेले दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झाले आहेत. आता हीच जोडी पुन्हा कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द रणवीरनेच दीपिकासोबत पुन्हा काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते.

आता त्याची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या आयुष्यावरच्या चित्रपटात दीपिकाची वर्णी लागू शकते. रणवीर या चित्रपटामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत असून, कपिल देव यांच्या म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याची संधी दीपिकाला मिळू शकण्याची चिन्हे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कबीर खान दिग्दर्शित चित्रपट ’83’ मध्ये रोमी भाटीया, म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. लवकरच यासंबंधी चित्रपट निर्माते भेट घेणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात पती- पत्नी असणारी ही लोकप्रिय जोडी रुपेरी पडद्यावरचे पती पत्नी साकारत पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. “83′ हा सिनेमा भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या पहिल्या विश्‍वचषकाच्या पार्श्‍वभुमीवर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)