पतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या

सांगवीतील घटना ः अनैतिक संबंध ठरले खूनाचे कारण

पिंपरी –
अनैतिक संबधाची माहिती मिळाल्यानंतर पतीने पत्नीला प्रियकरासोबत “रंगेहाथ’ पकडले. तिथेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत खून केल्याची घटना सांगवी येथे मंगळवारी (दि. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अशोक लक्ष्मण बिरादार (वय-32, रा. सुसगाव. मूळ रा. विजापूर, कर्नाटक) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर, या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण तुकाराम खुटेकर (वय-30, रा. पटेल रिजन्सी, ढोरेनगर, जुनी सांगवी) यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक आणि आरोपी लक्ष्मण याची पत्नी हे मूळचे एकाच गावातील असून त्यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. गेल्या काही महिन्यापासून ते दोघे पुन्हा संपर्कात आले होते. याची कुणकुण लक्ष्मणला देखील लागली होती. त्याने याबाबत लक्ष्मणने पत्नी आणि अशोकला प्रत्यक्ष समज दिली होती. मात्र, तरी लक्ष्मण घरात नसताना अशोक घरी येत असे व दोघे गपचूप भेटत होते. आपल्या अनुपस्थितीत अशोक घरी येत असल्याची माहिती मिळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण आपल्या पत्नीवर पाळत ठेऊन होता.

मंगळवारी रात्री लक्ष्मण घराबाहेर गेल्यानंतर त्याच्या पत्नीने अशोकला फोन करून घरी बोलावले. मात्र, लक्ष्मण कामावर न जाता घराजवळच ढोरेनगर चौकात थांबला होता. काही वेळाने लक्ष्मणची दोन्ही मुले चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खेळताना दिसली. त्याने मुलांना एवढ्या रात्री बाहेर का आला? असे विचारले असता त्यांनी घरात अशोक असल्याची माहिती दिली. अशोकचे नाव ऐकताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने घरात जाऊन पाहिले असता त्याची पत्नी आणि अशोक गप्पा मारत असल्याचे दिसून आले.

यावेळी चिडलेल्या लक्ष्मणने अशोकवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. अशोक रक्‍तबंबाळ झाल्यानंतर लक्ष्मणने तेथून पळ काढला. अशोक रक्‍तबंबाळ अवस्थेत कसाबसा घराबाहेर आला. काही अंतर चालल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. नागरिकांनी नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल जाऊन अशोकला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या साऱ्या प्रकारामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)