उत्तर प्रदेशात मानव तस्करीचा पर्दाफाश – 7 मुलांची सुटका

बागपत (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मानव तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि रमाला पोलीसांनी संयुक्त कारवाई करून ककडीपूर गावातून 7 मुलांची सुटका केली. येथीलच एका व्यक्तीने ही सात मुले मध्य प्रदेशातून आणली होती. मुले आणणारा मात्र पसार झाल्याचे समजते. मध्य प्रदेशातील सिंगरौलीच्या सरी ठाणा क्षेत्रातील चार मुले एका महिन्यापूर्वी बेपत्ता झाली होती. त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. सापडलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सीडब्ल्यूसी संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

ही चारही मुले बागपतच्या रमाला क्षेत्रात असल्याचे समजताच स्थानिक रमाला पोलीस आणि महिला हेल्पलाईन टीम सह ककडीपूर येथे छापा मारण्यात आल्यानंतर चारही मुले हाती आली. मध्य प्रदेश पोलीसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले आहे. अन्य तीन मुलांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ककडपूर गावातील एका व्यक्तीने ही मुले आणून एका शेतकऱ्याला विकली होती. त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेत होते. फरारी आरोपीविरूद्ध केस दाखल करण्यात आलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम उत्तर प्रदेशात मानव तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्या मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्‍चिम बंगालमधून अल्पवयीन मुलांना आणून त्यांची आजूबाजूच्या गावांत विक्री करतात, असे ककडीपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख नरेश कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)