मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-3)

-डाॅ.विजय कुलकर्णी

स्मृतिभ्रंश हा सिंड्रोम आहे. नुसता इतर आजारांसारखा साधा आजार नाही. फक्त डॉक्‍टर अन्‌ पेशंट पुरताच हा मर्यादित नाही, तर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, स्पिरीच्युअल, असे सारेच पैलू त्यासोबत जुळलेले आहेत. म्हणून स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम, जिव्हाळा, प्रेम, करुणा, वात्सल्य हेही औषधांबरोबर तितकेच महत्त्वाचे असते.

ट्रीटमेंट, थेरपीज सर्वात महत्त्वाचं-निदान..!

नातेवाईकांना हितचिंतकांना ही बाब सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी. वेळ वाया न घालवता संबंधित डॉक्‍टरांचा सल्ला घेणे ही प्राथमिक बाब. मॉडर्न औषधांनी हा आजार वाढण्यापासून, पसरण्यापासून थांबवता येतो. गंभीर स्टेज टाळता येते. कारणं शोधली की, इतर औषधं, उदा. रक्तदाब बीपी वाढलेला असल्यास कमी करण्याची, तसेच विटामिन्स-बी, फोलेटची कमी असल्यास, सुरू करता येऊ शकतात. डोनेपेझील, मेम्यांटीन, रिवास्टीग्मीन ही काही औषध कोलिनीस्टरेज नावाचे एन्जाइम कमी होण्यास मदत करतात… त्याची पातळी नियंत्रित ठेवतात. त्यामुळे सकारात्मता अन्‌ मेमरी वाढवण्यास मदत होते!

चिंता, निराशेसंबंधीतसुद्धा काही सुरक्षित औषधे वापरता येतात. जगणं सोपं व्हावं, त्रास कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानं ती घेता येऊ शकतात. स्मृतीभ्रंश हा सिंड्रोम आहे. नुसता इतर आजारांसारखा साधा आजार नाही. फक्त डॉक्‍टर अन्‌ पेशंट पुरताच हा मर्यादीत नाही, तर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, स्पिरीच्युअल, असे सारेच पैलू त्यासोबत जुळलेले आहेत.

म्हणून स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम, जिव्हाळा, प्रेम, करुणा, वात्सल्य हेही औषधांबरोबर तितकच महत्त्वाचे असते. कुणालाही होऊ शकणारा हा आजार असल्याने इम्पॅथी महत्त्वाची असते. स्वत:ला रुग्णाच्या जागी अनुभवून, परिस्थिती समजून घेता आली पाहिजे… मदतीचा, आधाराचा, माणुसकीचा भावही तितकाच महत्त्वाचा असतो..!

समाजाची नैतिक जबाबदारी

समाजाचा जबादार आणि प्रमुख घटक म्हणून आपला समाज सुंदर, स्वस्थ करणं ही आपली नैतिक, सामाजिक जबाबदारी आहे. समाज स्वस्थ निरोगी तर आपण निरोगी. जन्मापासून अंतापर्यंतच्या प्रवासात आठवणीच तर सोबत असतात. त्या हरवल्या की जगणं तितकं सुंदर राहत नाही. चेतनेचे, कल्पकतेचे, करुणेचे, भावनांचे पंख मनातल्या पाखराला सदैव हवेहवेसे वाटत असतात. त्यामुळे क्‍लिष्ट मानवी जीवन सोपे करण्यासाठी प्रयत्न करीत ही लढाई जिंकणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.

नर्सिंग केअर, स्वच्छता, निसर्ग सान्निध्य, संगीत, इंस्ट्रुमेंटल गाणी, छंद, नवीन टास्क, मेमरी चॅलेंज तसेच समुपदेशन फार महत्त्वाचे असते. खासकरून नातेवाईकांचे समुपदेशन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांची खूप चिडचिड होत असते. गिल्ट, राग येतो, अवेअरनेस, तसेच सायकोएज्युकेशन महत्त्वाचे असते..!

समाजाला या स्लो पण सातत्यानं वेग पकडणाऱ्या क्रॉनिक आजाराची ओळख व्हायला हवी. प्रिवेंटीव मेजर्स महत्त्वाचे आहेत. तरुणाईतील रोगप्रतिकारशक्ती, लाइफस्टाइल, व्यसनमुक्ती, निसर्गाच्या सान्निध्यातील सहज जीवनपद्धती, मनावरचं नियंत्रण, अँगर मॅनेजमेंट, ताणतणावाचं नियोजन, नेमका आणि संतुलीत आहार, झोप, रिक्रियेशन, कला, छंद… या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-1)   मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)