मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-2)

-डाॅ.विजय कुलकर्णी

स्मृतिभ्रंश हा सिंड्रोम आहे. नुसता इतर आजारांसारखा साधा आजार नाही. फक्त डॉक्‍टर अन्‌ पेशंट पुरताच हा मर्यादित नाही, तर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, स्पिरीच्युअल, असे सारेच पैलू त्यासोबत जुळलेले आहेत. म्हणून स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम, जिव्हाळा, प्रेम, करुणा, वात्सल्य हेही औषधांबरोबर तितकेच महत्त्वाचे असते.

लक्षणं अन्‌ निदान

निदानासाठी, न्युरॉलॉजिस्ट, सायकियाट्रीस्ट एमएमएसई नावाची पद्धत वापरतात. यात काही तंत्रशुद्ध प्रश्नावली असते. अन्‌ मग त्याच्या स्कोअरनुसार डाटा तयार केला जातो. आजार कुठल्या पातळीला गेला आहे, हे त्यावरून कळते. सुरुवातीला नातेवाईक, मित्रांकडून माहिती घेतली जाते. असंबद्ध बोलणे, रस्ता विसरणे, वेळ, माणसं, ठिकाण न ओळखता येणं. सोपी गणितं, बेरीज वजाबाकी न कळणे, मुलांचीही नावं विसरणे.

जुन्या घटना न आठवणे, बोलण्याचा स्पीड व टोन कमी होणे, शुन्यात जाणे, एकटक बघणे, कधीकधी कपड्यात लघवी होणे, भान नसणे, बोलताना शब्द न सापडणे, हालचाली न समजणे किंवा करता न येणे, अचानक मूड स्विंग्स, रडायला येणे, कपड्यांचं भान नसणे, थकवा येणे, चिडचिड होणे, निराश होणे, चेहऱ्यावर भाव नसणे किंवा असंबद्ध भाव असणे. भास भ्रम होणे (हॅल्युसिनेशन्स), बाथरूममधून रूमपर्यंत येता न येणे, घरातल्या घरातच रस्ता विसरणे.

समाजापासून दूर होणे, अशी लक्षणे आढळतात. व्यक्तिमत्त्वात लाक्षणिक बदल दिसतो. सनडोनर्स सिंड्रोम्स, सायंकाळी काही लक्षणांची तीव्रता वाढते. सुस्ती चिडचिडेपणा, रडायला येणे, तोल जाणे, चक्कर येणे, विसरभोळेपणा अशी लक्षणे आढळतात. बरेचदा वाढत्या वयाचाही असा परिणाम असतो…

एज रिलेटेड मेमरी एम्पायरमेंट
किंवा कॉग्निटिव्ह डिस्टर्बन्सेस!

या आजारात, माणुस कार्यक्षम अन सोशल असतो. फार त्रास होत नाही. तरुणाईतला प्रकार मात्र थोडा वेगळा असतो… “मेमरी लॉस’ म्हटल्याचे अनेक संवाद-शब्द प्रामुख्यानं आपल्या कानावर येत असतात. आधी आठवायचं याला. पण, आता हा विसरतो. छोट्याछोट्या गोष्टी, गुणाकार-भागाकार सोडवितानाही गडबड करतो.

तारीख, वेळ! विसरतो. ताणतणावाचं नियोजन न झाल्यानं विसरल्यासारखं होतं. चिडचिड वाढते. मन लागत नाही, अस्वस्थ वाटतं, क्रियाशीलता कमी होते. बऱ्याचदा नैराश्‍य किंवा इतर मानसिक किंवा न्युरॉलॉजिकल आजारांचा तो परिणामही असू शकतो..!

मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-1)  मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)