मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-1)

-डाॅ.विजय कुलकर्णी

स्मृतिभ्रंश हा सिंड्रोम आहे. नुसता इतर आजारांसारखा साधा आजार नाही. फक्त डॉक्‍टर अन्‌ पेशंट पुरताच हा मर्यादित नाही, तर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, स्पिरीच्युअल, असे सारेच पैलू त्यासोबत जुळलेले आहेत. म्हणून स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम, जिव्हाळा, प्रेम, करुणा, वात्सल्य हेही औषधांबरोबर तितकेच महत्त्वाचे असते.

मन हे अनाकलनीय, न झेपणारं कोडं आहे… अगदी अस्तित्वासारखंच गूढ, गहनविचारांच्या, तर्काच्या, आवाक्‍यापल्याडलं… अन्‌ आपल्या मेंदूत, करोडो मिलीयन-ट्रिलीयन मोजता न येणाऱ्या असंख्य पेशी आहेत. ताऱ्यांसारख्या, आकाशगंगेसारख्या पसरलेल्या… कॉम्प्लेक्‍स नेटवर्क जाळं. (न्युरॉन्स, न्युरोट्रान्समीटर्स)!

या पेशींमधे आपापले केमिकल्स असतात. रसायनांचा हा खेळ अविरतपणे अव्याहतपणे सतत सुरू असतो. जन्मापासून तर जगाच्या अंतापर्यंत..! केमिकल लोचा! सर्किट वगैरे! आपल्याही नकळत..! लढाईच असते जणू. काही रसायनं कमी होतात, काही वाढतात. काही पेशीतच लपून बसतात तर काहींना निघताच येत नाही. हा मेंदू अन्‌ ही रसायनंच खरं तर आपले मायबाप..!

आनंद, वेदना, स्मृती, विस्मृती, तत्त्वज्ञान, देशप्रेम, राग, लोभ, करुणा, माया, ममता, मत्सर ही त्याचीच पिल्लं… अन्‌ याच्या अवतीभवतीच मानवी आयुष्याचं गूढ आहे. हे कोडं सोडवण्याचा माणूस आपल्या परीनं प्रयत्नात असतोच. 21 सप्टेंबर रोजी मजागतिक अल्झायमर दिनानिमित्त या आजाराबाबत देशभरात जनजागृती करण्यात आली. मडिमेंशिया-स्मृतिभ्रंश-अल्झायमर’ हा असाच स्मृती-विस्मृतींचा खेळ…

विस्मृती जिंकते, स्मृती हारते, अन्‌ हा आजार जडतो… हळूहळू तयार होणारा, वेग घेणारा हा तसा जुनाट आजार… विसराळूपणा, मूड स्विंग्स, चिडचिडेपणा वाढतो तसेच कार्यक्षमता अन्‌ सामाजिकता मंदावते. माणूस एकाकी होतो अवतीभवतीच्या गर्दीतही! पण आता वृद्धांच्या पाठोपाठ तरुणाईलाही या आजाराने आपल्या विळख्यात ओढले आहे…
तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार, मोबाइल, औद्योगीकरण, जागतिकीकरण, निसर्गापासून दूर जाणारी जीवनपद्धती, ताणतणाव, जेवण-झोप असमतोल. व्यायामाचा अभाव, बैठी लाइफस्टाइल ही छोटी वाटणारी काही महत्त्वाची मोठी कारणं..!

तसे मेडिकल सायन्सनुसार डिमेंशियाचे, स्मृतिभ्रंशाचे बरेच प्रकार असतात. अल्झायमर, रक्तदाबावर नियंत्रण नसल्यानं मेंदूत होणारा रक्तस्त्राव (वास्कूलर डिमेंशिया), आनुवांशिक कारणं, टॉक्‍जीन्स, खाद्यपदार्थात फवारणीतील विषारी तत्त्व, हेवी मेटल्समुळे होणारे औषधांचे साइड इफेक्‍ट्‌स, मेटॅबोलिक विटामीन बी, फोलेटचे कमी प्रमाण, हार्मोनचा असमतोल, किडनी आजार, ट्युमर, रेडिएशन हायपॉक्‍झिया कार्बन मोनॉक्‍सॉइड व इतर वायू…

डोक्‍याला मार, अपघात, नशा दारूचे व्यसन, मेंदूशी संबधित इतर आजारांचा परिणाम उदा. पार्किंन्सन, मोरेज, सिन्ड्रोम ही सारी वेगवेगळी कारणं अन्‌ प्रकार. सर्वेक्षणानुसार सामान्यत: शंभरातल्या पाचजणांना साठीनंतर हा आजार उद्भवण्याची शक्‍यता असते. वयाच्या 85 नंतर हे प्रमाण 30 ते 40 टक्‍क्‍यांइतकं आढळते. या साऱ्या प्रकारांपैकी त्यातल्या त्यात प्रामुख्याने अल्झायमर हा प्रथम क्रमांकावर तसाच सर्वात कॉमन! निम्मे पन्नास टक्के रुग्ण ग्रासित.

सोप्या शब्दांत सांगावयाचं झाल्यास “म्हातारपणातला विसरभोळेपणा!’ 1907ला अलॉयस अलझायमर याने तो शोधून काढला म्हणून हे या आजाराचंही हेच नाव. 1, 14, 21 क्रोमोजोम्समधले जेनेटिक बदल होतात. यामुळे अमॉयलॉइड नावाचा प्रोटीनचा थर साचतो. अमॉयलॉइड प्लेक्‍स अन्‌ मेंदूचे आठवणींचे कार्य मंदावते. एसिटॅल्कोलीन, नोरेपाइनफ्रीन ही रसायनं कमी होतात. कोलीन एसीटॅल्ट्रासफेरास हे एन्जाइम कमी तयार होते. ही झाली मेंदुची सायंटीफिक भाषा. यामुळे पुढे आजाराचं चक्र सुरू होते.

मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-2)   मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)