बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ब्रॅंड असोसिएशनच्या वतीने आगामी 72व्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहे. हा सोहळा सेलिब्रेट करण्यासाठी ती खूपच एक्साइटेड आहे. हुमा कुरेशी ही दुस-यांदा कान्स महोत्सवाला हजेरी लावणार आहे. यापूर्वीही तिने गतवर्षी रेड कार्पेटवर एक यूनीक असे पॅंटसूट परिधान केलेले होते.
हुमा ही फ्रेंच रिव्हिराच्या वोदका ब्रॅड ग्रे गूजकडून कान्सला हजेरी लावणार आहे. यावेळी ती नव्याने लॉच करण्यात येणा-या ‘Live Victoriously’ ला सेलिब्रेट करणार आहे. याबाबत हुमा म्हणाली, गतवर्षी फेस्टिवलमध्ये ब्रॅडसह सहभागी होणे खूपच आनंदाची बाब होती. गेल्या काही वर्षांपासून इंडियन फिल्म इंडस्ट्रीला प्रतिष्ठित असा प्लॅटफॉर्म मिळत आहे. यावर्षी पुन्हा एकदा या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार असल्याने मी रोमांचित आहे.
दरम्यान, हुमा कुरेशी ही एक युवा मॉडेल असून तिने आर्टिस्ट म्हणून चॅलेंजिंग भूमिका साकारत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हुमा कुरेशी सोशल मीडियावरही खूप ऍटिव्ह असते, अन् तिचे फॉलोअर्सही लाखांच्या घरात आहे.