हुमा कुरेशीचा अरमेनियाच्या रस्त्यावरच डान्स

हुमा कुरेशीने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची खूपच चर्चा व्हायला लागली आहे. हुमा सध्या अरमेनियामध्ये सुट्टी एन्जॉय करायला गेली आहे. या सुट्टीदरम्यानचा आपला एक व्हिडीओ आणि काही फोटो तिने शेअर केले आहेत. त्यातील व्हिडीओमध्ये ती स्ट्रीट म्युजिशियनच्या तालावर रस्त्यावरच डान्स करताना दिसते आहे. मात्र, खरी गंमत तर पुढेच आहे.

हा म्युजिशियन आपले वाद्य वाजवण्यात गुंग असतो. त्याच्या तालावर नाचण्यात हुमाही दंग झालेली असते. तेवढ्यात तिथे आणखी एक महिला येते. त्या म्युजिशियनच्या बॅगेवर थोडे पैसे ठेवते आणि शांतपणे निघून जाते. त्या पैसे ठेवणाऱ्या स्त्री समोर हुमा झुकते आणि आदराने थॅंक्यू म्हणते. मात्र ही महिला निघून गेल्यावर हुमाला हसू आवरत नाही. ती पोट धरून हसायला लागते, असे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. आपण रस्त्यावरचे कलाकार आहोत, असा या बाईचा कसा गैरसमज झाला, याचीच तिला गंमत वाटत असणार.

-Ads-

दोनच दिवसांपूर्वी 28 जुलैला हुमाने आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिच्या लहानपणीच्या काही आठवणी तिने शेअर केल्या होत्या. लहानपणी तिला वाचनाची प्रचंड आवड होती. तिला सगळे पुस्तकी कीडा चिडवायचे. तेंव्हा फॅशन आणि मेकअपशी तिचा काहीही संबंध नसायचा. दिल्लीत राहत असताना तिच्याकडे कपड्यांपेक्षा जास्त पुस्तके असायची. कित्येकदा घालायला कपडे नसायचे म्हणून ती वडिलांचे शर्ट घालायची. तिला पूर्वी एका सिनेमासाठी ऑफर आली होती. त्यात एक भावनिक मुलगी आणि एक अॅॅक्शन करणारी असे दोन रोल होते. तिला अर्थात भावनिक मुलीच्या रोलसाठी विचारणा झाली होती. पण हुमाने अॅॅक्शन करणाऱ्या मुलीच्या रोलसाठी हट्ट धरला होता. आतापर्यंत जे काही यश मिळाले आहे, त्यामध्ये आपल्या कष्टाचा वाटा फारच थोडा आहे. त्यापेक्षा अधिक यशासाठी आपले प्रयत्न चालू असल्याचेही तिने सांगितले. मात्र तिच्या हातात नवीन कोणते प्रोजेक्टस आहेत, याबाबत ती योग्य वेळी कळवणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा रोल असलेला “काला’ रिलीज झाला आहे. तेंव्हापासून ती जरा निवांत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)