हुयावेईच्या वरिष्ठ पदाधिकारी महिलेस कॅनडात अटक; अमेरिकेकडे प्रत्यार्पण

ओटावा: “हुयावेई’ या चिनी टेलिकॉम कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि कंपनीच्या संस्थापकांच्या कन्येला कॅनडामध्ये अटक करून अमेरिकेकडे सोपवण्यात आले आहे. अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे हुआवेई कंपनीवरही अमेरिकेची करडी नजर आहे. या निर्बंधांचे उल्लंघनाची तपासणी अमेरिकेकडून केली जात असल्यानेच हुयावेई कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकारी महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र या अटकेमुळे चीनचा संताप झाला आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धात तहाची स्थिती निर्माण झाली असतानाच ही अटक झाली आहे.

मेंग वान्झोहू असे अटक करून अमेरिकेत पाठवलेल्या चिनी महिलेचे नाव असून त्या हुयावेई कंपनीच्या वित्तीय अधिकारी आहेत. हुयावेई कंपनीकडून अमेरिकेचे निर्बंध मोडल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली आहे. वान्झोहू यांच्या अटकेचे पडसाद आशियातील शेअर बाजारावरही उमटले. चीन आणि हॉंगकॉंगमधील टेक्‍नोलॉजीशी संबंधित कंपन्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

चीनकडून अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचवण्याचे काम केले जात आहे. अमेरिका हे शांत बसून कधीही खपवून घेणार नाही, असे अमेरिकेचे सिनेटर बेन सास यांनी म्हटले आहे. मेंग यांना 1 डिसेंबररोजी वॅन्कुवर येथे अटक झाली. त्यांचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण केले जाईल आणि शुक्रवारी त्यांच्या जामीनावर सुनावणी होईल, असे कॅनडाच्या न्याय मंत्रालयाने म्हटले आहे.

संयोगाने दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यापार युद्ध थांबवण्यासाठी अर्जेंटिनात समझोता केला. ओटावातील चीनच्या दूतावासाने मेंग यांच्या सुटकेचीही मागणी केली आहे. अशा प्रकारच्या कारवाईवर चीनने तीव्र निषेधाची भूमिका घेतली आहे. मेंग यांच्याकडून काही चुकीचे झाल्याची आपल्याला माहिती नाही. त्यांच्यावरील आरोपांची आपल्याला माहितीही नसल्याचे हुयावेई कंपनीने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)